13 July 11:47

पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता


पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता

कृषिकिंग, पुणे: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाच्या पुनरागमनासाठी वातावरणात अनुकूल स्थिती निर्माण झाली असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात येत्या दोन दिवसात पुन्हा पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढे सरकला आहे. त्यामुळे सध्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागात पावसाच्या आगमानाची शक्‍यता आहे. त्याचबरोबर केरळ ते कर्नाटक पर्यत द्रोणीय स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असून ही स्थिती जर निर्माण झाली तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सुध्दा चांगला पाऊस अपेक्षित आहे. सध्या कोकण आणि गोवा परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. त्याचबरोबर घाट माथ्यावर ही पावसाच्या सरी कोसळत आहेत. पण मैदानी प्रदेशात मात्र पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात सुध्दा अनेक भाग अद्याप ही कोरडा आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात जून महिन्यात सरासरीइतकासुद्धा झाला नाही. त्यामुळे बळीराजा आता पावसाच्या प्रतिक्षेत आहे. असेही हवामान विभागाने सांगितले आहे.टॅग्स