18 January 11:00

पारंपरिक शेतीची पद्धत बदलण्याची गरज- पवार


पारंपरिक शेतीची पद्धत बदलण्याची गरज- पवार

कृषिकिंग, बारामती: "शेतीशिवाय अन्य क्षेत्रातूनही उत्पन्न मिळवता आले पाहिजे. त्यामुळे जगात होत असलेल्या बदलांबरोबर पारंपरिक शेतीची पद्धत बदलली पाहिजे," असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बारामती येथे व्यक्त केले आहे.

शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअप्ससाठी निवडलेल्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी महाविद्यालयाच्या इनक्‍युबेशन व इनोव्हेशन सेंटरची पायाभरणी इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. पीटर कार्बेरी, टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार डॉ. बर्जिस तारापोरवाला व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे काम देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून घेण्यासाठी शेतकरी येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांनी फक्त पारंपरिक शेती करून चालणार नाही, तर शेतीत बदल करावे लागतील. त्यासाठी विद्यार्थ्यांनाही संशोधक व्हावे लागेल. असेही पवार यावेळी म्हणाले आहे.