02 January 11:36

पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांसाठी ममतांची मोठी घोषणा


पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांसाठी ममतांची मोठी घोषणा

कृषिकिंग, कोलकाता: अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस सुरु असतानाच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची घोषणा केली आहे. एक योजना ही पीक विम्यासंदर्भात तर दुसरी योजना ही शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूशी निगडित २ लाख रुपयांचा विमा देणारी आहे. याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकर ५ हजार रुपये प्रति एकर भांडवली खर्च दिला जाणार आहे. असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे की, "राज्यात जवळपास ७२ लाख शेतकरी कुटुंब आहे. त्यामुळे या शेतकरी कुटुंबांना कोणतेही नुकसान सोसावे लागू नये. यासाठी पीक विमा योजनेचा प्रीमियम राज्य सरकार भरणार आहे. वर्षातील दोन्ही हंगामाच्या सुरुवातीला प्रति एकर २५०० रुपये अशी वर्षभरात एकूण ५००० रुपये भांडवल खर्च दिला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून खर्च करण्यात येईल."