23 August 14:45

पवारांनी शब्द पाळला; हवामान विभागाला १०० किलो साखर पाठवली


पवारांनी शब्द पाळला; हवामान विभागाला १०० किलो साखर पाठवली

कृषिकिंग, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवामान विभागासाठी खास बारामतीहून १०० किलो साखर पाठवली आहे. पावसाचा अंदाज खरा ठरल्याने त्यांनी आपला दिलेला शब्द पाळला आहे.

“मान्सून लांबल्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. दुबार पेरणी म्हणजे एक प्रकारचे आर्थिक संकटच आहे. पण या क्षेत्रातील काही तज्ज्ञ लोकांनी सांगितले आहे की, येत्या चार दिवसात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चांगला पडणार आहे. हवामान विभागाने दिलेला हा अंदाज खरा ठरल्यास त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालीन” असे उपरोधिक विधान शरद पवार यांनी हवामान विभागाचे अंदाज आणि हतबल बळीराज्याची परिस्थितीवर बोट ठेवत केले होते.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुरु झालेला पाऊस राज्यभर सर्वदूर बरसला. त्यामुळे शरद पवारांनी बारामतीवरुन १०० किलो साखर वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी पाठवल्याचे राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले आहे.टॅग्स