03 April 10:24

पवार कुटुंबावर बोलण्याऐवजी मोदींनी दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोलावं- शरद पवार


पवार कुटुंबावर बोलण्याऐवजी मोदींनी दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोलावं- शरद पवार

कृषिकिंग, कोल्हापूर: "पवार कुटुंबावर बोलण्याऐवजी मोदींनी दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोलावं." अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक व राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

वर्धा येथील सभेत पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबात कलह सुरू असून, पुतणे अजित पवार पक्षावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते. तो संदर्भ घेऊन पवार म्हणाले की, "पंतप्रधान विदर्भात दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, विकासाच्या मुद्द्यावर काहीतरी बोलतील असे वाटले होते. पण परिस्थितीच त्यांना काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे."

आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांमध्ये वाढलो, त्याच संस्कारांमध्ये आमची जडणघडण झाली आहे. त्यामुळे मोदींनी पवार कुटुंबीयांची काळजी करू नये. असेही पवार यावेळी म्हणाले आहे.टॅग्स