07 May 12:06

परवडत नसेल तर कांदा खाऊ नका- सुभाष देशमुख


परवडत नसेल तर कांदा खाऊ नका- सुभाष देशमुख

कृषिकिंग, इंदापूर(पुणे): ज्यांना परवडत नसेल त्यांनी कांदा खाऊ नका. वर्षभर कांदा खाल्ला नाही तर काही बिघडत नाही, असा सल्ला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी नागरिकांना दिला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कांदा खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

जैन समाज तर कांदा खातच नाही. उलट त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि जे कांदा खावून रडतात त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. बाजारात कांद्याचे भाव जरा वाढले, की कांदा खाताना डोळ्यात पाणी आले...असे आशयाचे रडगाणे सुरु होते. शेतकऱ्यांना भाव मिळत असेल तर मिळू द्या, त्यांना चांगले दिवस आले तर शेतकरी आत्महत्या थांबतील, असेही ते यावेळी म्हणाले आहे.टॅग्स