17 October 14:05

परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामासाठी देश सज्ज- कृषी सचिव


परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामासाठी देश सज्ज- कृषी सचिव

कृषिकिंग, नवी दिल्ली: या वर्षी मान्सून जरी कमी प्रमाणात झाला असला तरी परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामामध्ये देश आघाडीवर आहे. त्यामुळे गहू, हरभरा यांसारख्या रब्बी पिकांची लागवड करणे शक्य झाले आहे. रब्बी हंगामाची अपेक्षा असून खरीपाची कमी भरून काढता येणार आहे. हा पाऊस जरी एकूण पावसाच्या ५ टक्केपेक्षा कमी असला तरी लागवडीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.

उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतेक भागांत कमी पाऊस पडतो. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांना पावसाची कमतरता असली तरी कालवा सिंचनामुळे पाण्याची कमतरता भासत नाही.

केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या महालनोबिस पीक अंदाजानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत १७ राज्यांमधील २२५ पेक्षा जास्त जिल्हे सामान्य पावसाच्या तुलनेत कमी आहेत. हा अंदाज मुख्यतः उपग्रहावरील आधारित रिमोट सेन्सिंग इंडेक्स, पर्जन्य डेटा, मातीच्या आर्द्रतेचा अंदाज, पीक लागवड क्षेत्र आणि सिंचन आकडेवारी (जे दुष्काळ नियंत्रणासाठी वापरली जाते) यावर अवलंबून आहे. असे शोभना के पटनायक यांनी सांगितले आहे.टॅग्स