04 December 15:05

पंतप्रधान मोदींनी घेतली मनीऑर्डरची दखल; कांदाप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला


पंतप्रधान मोदींनी घेतली मनीऑर्डरची दखल; कांदाप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला

कृषिकिंग, नाशिक: नाशिकचे कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे ( नैताळे, ता.निफाड) यांच्या तक्रारीची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली आहे. गेल्या आठवड्यात कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी साठे यांनी १११८ रुपयांची पंतप्रधान मोदींना मनी ऑर्डर केली होती. या मनीऑर्डरची दखल घेत पीएमओ ऑफिसने कांदाप्रश्नी नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून माहिती मागितली आहे.

'कृषिकिंग'ने गेल्या आठवड्यात वृत्त प्रसिद्ध करत या शेतकऱ्याची व्यथा मांडली होती. (बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. http://bit.ly/2Rp8Abh )

कांद्याला १०० ते २०० रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठे अडचणीत आले आहेत. कांद्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनं झाली. पण आता यावर तोडगा निघणार हे नक्की. कारण साठे यांची मनी ऑर्डर मिळाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयानं मुख्यमंत्री कार्यालयामार्फत कांद्याचा अहवाल मागितला आहे. याची माहिती मिळताच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ संपूर्ण अहवाल पाठवला आहे.

महिन्याभरात २१०० ते २५०० रुपये क्विंटल असणारा कांदा अवघा १०० ते २०० रुपये क्विंटल कसा झाला? त्यामुळे आता यावर पीएमओ काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.