15 June 16:41

निर्यात मूल्य शून्य; मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नाहीच...


निर्यात मूल्य शून्य; मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा नाहीच...

कृषिकिंग, पुणे: कांद्याच्या दरात सुधारणा होण्यासाठी केंद्र सरकारकडून २ फेब्रुवारी २०१८ रोजी किमान निर्यात मूल्य (एमईपी) शून्य करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही कांद्याची निर्यातीत घसरण झाल्याचे समोर आले आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये कांद्याच्या निर्यातीत घट होऊन, ती १ लाख १ हजार ३०७ टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ३ लाख ४८ हजार ०७० टन इतकी नोंदवली गेली होती. त्यामुळे निर्यात मागणी कमजोर असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो दर मिळणे मुश्कील झाले आहे.

१४ जूनच्या उपलब्ध बाजारभावानुसार, सध्या लासलगाव बाजार समितीत कांद्याला किमान ३४१ रुपये तर कमाल ९१५ रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत कांद्याला किमान २०० रुपये तर किमान ९५० रुपये प्रति क्विंटल, अहमदनगर बाजार समितीत कांद्याला किमान २५० रुपये ते कमाल ३५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर तिकडे राजस्थानातील कोटा आणि उदयपुर बाजार समितीत कांद्याला किमान २०० रुपये ते कमाल ९०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूर बाजारसमितीमध्ये कांद्याला किमान २०० रुपये तर कमाल ६०० रुपये प्रति क्विंटल आणि देवास बाजार समितीमध्ये कांद्याला किमान ३०० तर कमाल ८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.टॅग्स