25 December 16:27

नाशिकच्या द्राक्षांची यावर्षी ऑस्ट्रेलिया वारी


नाशिकच्या द्राक्षांची यावर्षी ऑस्ट्रेलिया वारी

कृषिकिंग, नाशिक: कॅनडा अन्‌ चीनची बाजारपेठ भारतीय द्राक्षांसाठी खुली असून, यावर्षी आता ऑस्ट्रेलियानेही आपली दारे खुली केली आहेत. त्यामुळे द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत ६ हजार ३९० टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

यामध्ये सर्वाधिक ४ हजार ७२० टन द्राक्षे रशियात पाठविण्यात आली आहेत. युरोपमध्ये ५२९ टन तर युरोपव्यतिरिक्त राष्ट्रांमध्ये ५ हजार ६८१ टन द्राक्षे रवाना झाली आहेत. चीनला १८ टनाचा एक कंटेनर पाठवण्यात आला आहे.

नाशिकमधून गेल्या वर्षी चीनला २५ कंटेनरमधून ४०० टन द्राक्षे पाठवण्यात आली होती. त्यातच अमेरिका आणि चीनमधील संघर्षात यावर्षी चीनच्या व्यापाऱ्यांकडून भारतीय द्राक्षांना अधिक पसंती मिळण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. याखेरीज बांगलादेशमध्येही द्राक्षे पाठविण्यात येत आहेत. द्राक्षांना ६० ते १३० रुपये किलो असा भाव मिळत आहे. रंगीत वाणाला मिळणाऱ्या सर्वाधिक भावाचा त्यात समावेश आहे.टॅग्स