06 January 17:05

नाशिक मार्केटमध्ये द्राक्ष खरेदी-विक्री व्यवस्थेला सुरुवात


नाशिक मार्केटमध्ये द्राक्ष खरेदी-विक्री व्यवस्थेला सुरुवात

कृषिकिंग, नाशिक: द्राक्ष बागेतील खरेदी-विक्रीतील व्यवहारात होणारी शेतकऱ्याची फसवणूक टाळण्याचा हेतूने, तसेच शेतकऱ्यांना रोख पैसे मिळावेत यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने द्राक्ष खरेदी-विक्रीची व्यवस्था सुरु केली आहे.

द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमधील शरदचंद्र पवार फ्रुट मार्केटमध्ये द्राक्ष खरेदी-विक्रीस प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी जवळपास २५० क्रेट द्राक्ष शेतीमाल विक्रीसाठी आणले होते. फ्रुट मार्केटमध्ये सिन्नर, दुगाव, मातोरी व दिंडोरी भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीसाठी आणला.

थॉमसन वाणाला द्राक्ष ३५ रुपये किलो तर शरद सीडलेस द्राक्ष ४० रुपये किलो दराने भाव मिळाला. लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ रोख पैसे दिले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे चित्र असल्याचे पाहायला मिळाले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह द्राक्ष व्यापारी उपस्थित होते.टॅग्स