13 December 17:16

नाशिक जिल्ह्यातील ८४ हजार ३७४ शेतकऱ्यांना कर्जमाफी


नाशिक जिल्ह्यातील ८४ हजार ३७४ शेतकऱ्यांना कर्जमाफी

कृषिकिंग, नाशिक: “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील ८४ हजार ३७४ पात्र शेतकऱ्यांना एकूण ३७४ कोटी ३२ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात ५६ हजार २९६ शेतकऱ्यांना कर्जमाफी तर २८ हजार ७८ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार शेवटच्या पात्र शेतकऱ्यास या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.” अशी माहिती जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांनी दिली आहे.

“तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत १ लाख ३८ हजार सभासद शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ७८ हजार ७५४ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आजपर्यंत ३३३ कोटी २४ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे,” अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांनी दिली आहे.

दरम्यान जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. अशी घोषणा दोनच दिवसांपूर्वी नागपूर येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.