08 November 15:18

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष काढणीचा हंगाम लवकरच सुरु होणार


नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष काढणीचा हंगाम लवकरच सुरु होणार

कृषिकिंग, नाशिक: देशातील सर्वात मोठा द्राक्ष उत्पादक प्रदेश असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात ताज्या द्राक्ष काढणीचा हंगाम लवकरच सुरु होतो आहे. आगाप द्राक्षामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण होईल त्याच बरोबर त्यापैकी काही द्राक्ष ही रशिया व दुबईला निर्यात होण्याची शक्यता आहे.

“परिसरातील शेतकऱ्यांनी रोपांची छाटणी करून प्रयोग केला आणि मुख्यतः कसमादे पट्ट्यात लवकर पीक मिळवले आहे. यामध्ये कळवण, सटाणा (बागलाण) मालेगांव या तालुक्यांचा तर देवळाच्या सीमावर्ती भागाचा समावेश आहे.” अशी माहिती द्राक्ष शेतकरी खंडेराव शेवाळे यांनी दिली आहे. विशेषत: द्राक्ष काढणी ही १५ जानेवारीनंतर सुरु होते आणि त्याद्वारे मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात केली जाते. असेही ते म्हणाले आहे.

“महाराष्ट्रातील द्राक्ष बाग छाटणी ही ऑक्टोबर मध्ये सुरुवात झाली होती. त्यामुळे आता या बागांपासून मिळणाऱ्या द्राक्षांची काढणी ही डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरु होईल. असा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे आणि अनियमित वातावरणामुळे काही नुकसान झाले होते. ज्यामुळे जानेवारी काढणीचा अंदाज लावला जाऊ शकला नाही.” असे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघटनेचे अध्यक्ष माणिकराव पाटील यांनी सांगितले आहे.

“नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात सुमारे ४ हजार ५०० ते ५ हजार ६०० एकर द्राक्षबागा आहेत. तर दिंडोरी, निफाड आणि नाशिक तालुके द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असतात. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन केंद्र शासनाने द्राक्ष निर्यातिकरिता ग्रेप्सनेट कार्यक्रम अंमलात आणला आहे. सध्या, फक्त ग्रेप्सनेटने यूरोप आणि यूके यांना निर्यात केलेल्या द्राक्षांचे निरीक्षण केले जात आहे.” असेही माणिकराव पाटील यांनी सांगितले आहे.टॅग्स