11 February 12:00

नाशकात गारपीट तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता


नाशकात गारपीट तर मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता

कृषिकिंग, पुणे: उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यभरात कडाक्याच्या थंडीने उच्चांक गाठला आहे. नाशिक आणि महाबळेश्वरमध्ये तर पारा शून्यापर्यंत खाली आला आहे. दरम्यान, मंगळवारी (१२ फेब्रुवारी) नाशिक जिल्ह्यात गारपीट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) खात्याने वर्तविला आहे.

तर ११ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी याकालावधीत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. मंगळवारीही मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, वातावरणात गारठा वाढल्यानं पहाटेच्या दवबिंदूंचंही बर्फात रुपांतर होत आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागांवर सकाळच्या सुमारास बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान होत आहे.