13 April 12:45

नाफेडची २५ हजार टन कांदा खरेदी पुढील आठवड्यात सुरु होणार


नाफेडची २५ हजार टन कांदा खरेदी पुढील आठवड्यात सुरु होणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ अर्थात नाफेड ही सहकारी संस्था महाराष्ट्रातून रब्बी हंगामातील २५ हजार टन कांदा खरेदी करणार आहे. नाफेडकडून ही खरेदी पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. अशी माहिती नाफेडचे मुख्य व्यवस्थापक संजीवकुमार चड्डा यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यासंदर्भात घोषणा करत २५ हजार टन खरेदी करणार असल्याचे सांगितले होते. त्या खरेदीला आता पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. सरकारकडून ही खरेदी अधिक आवक होत असल्यामुळे, आणि रब्बीच्या कांद्याचा सरकारी साठा करत शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळावा. या दुहेरी उद्देशाने केली जात आहे. चड्डा यांनी सांगितले आहे की, सध्या बाजारात रब्बी हंगामातील कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात होत असून, या कांद्यामध्ये आर्द्रता (ओलसरपणा) ही अधिक आहे. त्यामुळे काही दिवस थांबून आता या सरकारी खरेदीला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. ही खरेदी प्रामुख्याने आशियातील प्रमुख कांदा बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीतून आणि नागपूर जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीतून केली जाणार आहे.

त्यांनी पुढे सांगितले आहे की, “नाफेड आपल्या युनिटमध्ये ५ हजार टन कांद्याचा साठा करणार असून, उर्वरित २० हजार टन कांदा भाडेतत्वावर गोदामांमध्ये ठेवला जाणार आहे. २ ते ३ महिन्यांनतर सरकारच्या आदेशानंतर हा कांदा ग्राहकांना बाजारात उपलब्ध करून दिला जाईल.”टॅग्स