13 December 14:56

नर्मदा-पार्वती नदीजोड प्रकल्पाला मध्यप्रदेश सरकारची मंजुरी


नर्मदा-पार्वती नदीजोड प्रकल्पाला मध्यप्रदेश सरकारची मंजुरी

कृषिकिंग, भोपाळ(मध्यप्रदेश): “मध्यप्रदेश सरकारने ७ हजार ५४६ कोटी रुपये खर्चाच्या नर्मदा-पार्वती नदी जोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प राज्यातील माळवा भागातील दोन लाख हेक्टर शेती क्षेत्रावर सिंचन सुविधा निर्माण करणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नर्मदा नियंत्रण मंडळाच्या (एनसीबी) झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.” अशी माहिती मध्यप्रदेश सरकारच्या विभागीय जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे.

"नर्मदा-पार्वती नदी जोडणी प्रकल्पाचे बांधकाम चार टप्प्यांत पूर्ण केले जाणार असून, प्रत्येक टप्प्यात किमान ५० हजार हेक्टर जमिन सिंचनाखाली आणली जाणार आहे. मध्यप्रदेशच्या सीहोर आणि शाजापूर जिल्ह्यातील ३६९ गावांतील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून. त्यासाठी इंदिरा सागर प्रकल्पातून पाणी उचलले जाणार आहे.” असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.