23 October 17:10

नरेंद्र मोदींचं पंतप्रधानपद जाणार; शरद पवारांचे भाकीत


नरेंद्र मोदींचं पंतप्रधानपद जाणार; शरद पवारांचे भाकीत

कृषिकिंग, मुंबई: "आगामी लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होऊन मोदींना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागेल," असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तवले आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्यांनी हे भाकीत वर्तवले आहे.

"२०१९ मध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होईल. ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्या हाती राहणार नाही. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल, असे वाटत नाही. नरेंद्र मोदींची प्रतिमा ही अटलबिहारी वाजपेयींसारखी नाही. दोघांच्या व्यक्तिमत्वात बराच फरक आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांना संधी देण्यात येईल. सर्व पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल. परंतु, मी नरेंद्र मोदींना समर्थन देणार नाही," असेही शरद पवार यांनी स्पष्ट यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, यावेळी त्यांना तुम्ही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, पवारांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला आहे.