21 December 14:05

धुळे: भाजप मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर स्वाभिमानीचे कांदा फेक आंदोलन


धुळे: भाजप मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर स्वाभिमानीचे कांदा फेक आंदोलन

कृषिकिंग, धुळेः कांदा रस्त्यावर टाकण्याऐवजी मंत्र्यांना फेकून मारा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे मंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कार्यालयाबाहेर कांदा फेकून आज (शुक्रवार) आंदोलन केले आहे.

राज ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी जो मंत्री दिसेल त्याला कांदा फेकून मारा. इतका कांदा मारा की मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे. मग तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा. शुद्धीवर आल्यावर पुन्हा त्याला मारा. असे ते म्हणाले होते.

ठाकरे यांच्या वक्तव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृतीत आणण्याचा प्रयत्न केला. पारोळा रस्त्यावर असलेल्या भामरे यांच्या कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदा फेकून आंदोलन केले.टॅग्स