29 December 10:24

धर्मा पाटलांच्या कुटुंबियांना डांबून ठेवणे ही आणीबाणी- शरद पवार


धर्मा पाटलांच्या कुटुंबियांना डांबून ठेवणे ही आणीबाणी- शरद पवार

कृषिकिंग, मुंबई: मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखुबाई आणि मुलाला पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौ-यावेळी डांबून ठेवले, ही अघोषीत आणीबाणी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

हा अत्यंत असंवेदनशील प्रकार आहे. लोकशाहीची मूल्ये पायी तुडवून अघोषित आणीबाणी पुकारणाऱ्या सरकारने हे वेळीच थांबवावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून निर्वाणीचा लढा पुकारावा लागेल, असे ट्विट पवार यांनी केले आहे.

भाजप सरकारने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठली आहे. धर्मा पाटील यांनी शासनाच्या अन्यायकारक व अनागोंदी कारभाराला कंटाळून मंत्रालयात आत्महत्या केली. आता मुख्यमंत्र्यांच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी धर्मा पाटील यांच्या विधवा पत्नी सखूबाई व मुलगा नरेंद्र यांना यांना कोठडीत डांबण्यात आले. असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.