13 June 14:34

धनाड्यांची थकबाकी भरणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर- शरद पवार


धनाड्यांची थकबाकी भरणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा विसर- शरद पवार

कृषिकिंग, सोलापूर:“राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी सरकार आहे. राज्यातील उद्योजक, कारखानदार अशा धनदांडग्यांची बँकांकडे असणारी ८५ हजार कोटींची थकबाकी भरण्याची तयारी दर्शविणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांचा मात्र विसर पडला आहे,” अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सोलापुरातील कुर्डूवाडी येथील आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

बळीराजा जागृत अन् संघटित झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळत नाही. ती मिळवून घेण्याची ताकद तुमच्या- आमच्यामध्ये आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जागरुक बनले तर मी तुम्हाला शब्द देतो की, सध्याच्या केंद्र आणि राज्यातील राजकारण बदलल्याशिवाय गप्प बसणार नाही. समाजकारणात असताना आपण जागरुक राहणे गरजेचे आहे. योग्य निर्णय घेतले नाही तर त्याचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतील, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे.टॅग्स