26 January 14:50

द्राक्ष, डाळिंब, बाजरी निर्यातीसाठी व्हिएतनामने बाजारपेठ खुली करावी- भारत


द्राक्ष, डाळिंब, बाजरी निर्यातीसाठी व्हिएतनामने बाजारपेठ खुली करावी- भारत

कृषिकिंग, नवी दिल्ली: कृषी माल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने व्हिएतनामला आपल्या द्राक्ष, डाळिंब, बाजरी आणि अँथुरियम (एक प्रकारचे फुल) साठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने ट्विट करत जाहीर केले आहे की, भारताने आपल्या औषधे उत्पादक कंपन्यांना बरोबरीचा मौका देण्यासाठी, मांस प्रक्रिया कंपन्यांसाठी नोंदणी प्रकिया अधिक सुलभ करण्याचीही मागणी केली आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये हनोई येथे झालेल्या चौथ्या व्यापाराधारित संयुक्त बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे.

भारत चीननंतर जगातला दुसरा सर्वात मोठा फळे व भाजीपाला उत्पादक देश आहे. भारतातील कृषी उत्पादनांसाठी व्हिएतनाम, सऊदी अरब, संयुक्त अरब अमीरात, अमेरिका आणि मलेशिया ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताची जवळपास ८० टक्के निर्यात ही याच देशांमध्ये केली जाते.