10 November 07:00

द्राक्ष सल्ला: वेलफुटी काढल्यानंतर संजीवकाची फवारणी करावी.


द्राक्ष सल्ला: वेलफुटी काढल्यानंतर संजीवकाची फवारणी करावी.

स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ छाटणीनंतर १४ ते १६ दिवसापर्यंत आवश्यक तेवढे जोमदार आणि सशक्त घड ठेऊन अनावश्यक घड व वेलफुटी काढून टाकणे गरजेचे आहे. आपला उद्देश लक्षात घेऊन घडांची संख्या ठेवावी. अनावश्यक वेलफुटी व घड काढल्यामुळे बागेत खेळती हवा राहते व रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.
ज्या बागेत छाटणी होऊन वेलफुटी काढून झालेल्या आहेत व पोपटी रंगाचा घड (प्री ब्लूम अवस्था) निघाला आहे अशावेळी १८ ते २० दिवसात जी. ए. ३ ची १० पी.पी.एम (१ ग्रॅम १०० लिटर पाण्यात) या संजीवकाची फवारणी आवश्यक आहे. त्यामुळे पाकळ्यातील अंतर वाढेल व घड मोकळा होऊन घडाचा आकार वाढेल व पुढे विरळणी (थिनिंग) चा खर्च वाढणार नाही. जी. ए. ३ ची कार्यक्षमता वाढण्यासाठी फवारणीच्या एक दिवसाअगोदर ०.५ ग्रॅम बोरॉंन + ०.५ ग्रॅम झिंक प्रति लिटर पाण्यातून फवारणी करून घ्यावी.
डॉं. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे