14 October 07:00

द्राक्ष सल्ला: बागेत वेलीची पाणगळ करणे


द्राक्ष सल्ला: बागेत वेलीची पाणगळ करणे

द्राक्ष बागेत फळछाटणीनंतर बागेत एकसारख्या फुटी निघण्याकरिता डोळे फुगलेले असावेत. याकरिता बागेत पाणगळ करणे गरजेचे आहे. बागेत जुलै-सप्टेंबरच्या कालावधीत आलेल्या पावसात बागेत विविध रोगांचा प्रसार होतो. यामुळे आधीच काही प्रमाणात पाणगळ झालेली असते. त्यामुळे पानगळीचा कालावधी ठरवावा. बागेत हिरवीगार व रोगमुक्त पाने असल्यास फळछाटणीच्या 15 दिवसांपूर्वी पाणगळ करावी. ही पाणगळ इथेफॉन या रसायनाचा वापर करून केल्या जाते. इथेफॉनची फवारणी 2.5 ते 3.0 मिली. + 0:52:34 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करावी. परंतु, फवारणी करण्यापूर्वी 5-6 दिवसापासून वेलीस पाण्याचा ताण दिल्यास पाणगळीवर चांगले परिणाम दिसून येतात.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स