28 October 07:00

द्राक्ष सल्ला: फुट नियोजन व रोगनियंत्रण


द्राक्ष सल्ला: फुट नियोजन व रोगनियंत्रण

स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ एकसारख्या फुटींकरिता नियोजन - बागेत गेल्या हंगामात तयार झालेल्या कमी अधिक जाडीच्या काड्या यावेळी असल्यामुळे एकसारखी फूट निघण्यास अडचण येते. अशावेळी बागेत उपलब्ध असलेल्या जास्त जाडीच्या काड्यांना फक्त पुन्हा तितक्याच मात्रेने पेस्टिंग करावे व त्याचबरोबर त्या काडीला पिळा द्यावा. यामुळे सर्वच काड्या एकाचवेळी फूटण्यास मदत होईल.

रोगनियंत्रण- पावसाळी वातावरणात वेलींवर डाऊनी मिल्ड्यू, भुरी व करपा सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला असतो. यावेळी आपण छाटणीपूर्वी पाणगळ केली तरी सुद्धा काही रोगग्रस्त पाने काडीवर तशीच राहतात. तेव्हा फळछाटणीनंतर बागेत 1 टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी ओलांडे, खोड व जमिनीवर आणि बांध्यावर सुद्धा करून घ्यावी. हीच फवारणी पुन्हा ४ - ५ दिवसात (डोळे फुटण्यापूर्वी) करून घेतल्यास या महत्त्वाच्या रोगावर नियंत्रण ठेवणे सोपे होते.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे