06 October 07:00

द्राक्ष सल्ला: फळछाटणीपूर्वी अन्नद्रव्याची पूर्तता


द्राक्ष सल्ला: फळछाटणीपूर्वी अन्नद्रव्याची पूर्तता

ऑक्टोबर महिना हा द्राक्षबागेत फळछाटणीच्या दृष्टीने महत्त्वाचा कालावधी आहे. ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या फळछाटणीनंतर बागेतील आवश्यक ती कार्यवाही करून मार्च महिन्यात फळ बाजारात उपलब्ध होते. तेव्हा फळछाटणी करिता काही महत्त्वाची कार्यवाही यावेळी करणे गरजेचे आहे.
फळछाटणीपूर्व तयारी : अन्नद्रव्याची पुर्तता: फळछाटणीपूर्वी बागेत प्रत्येक वेलीस साधारणतः दोन घमेली शेणखत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, याप्रमाणे टाकून त्यावर माती झाकून घ्यावी. याचसोबत पुढील काळात आवश्यक असलेले काही महत्त्वाचे अन्नद्रव्य जसे फेरस सल्फेट 10 किलो, 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर प्रमाणे टाकून मातीत मिसळवून घ्यावे. ज्या बागेमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त आहे अशा बागेत फळ छाटणीपूर्वीच 40-45 किलो सल्फर बोदामध्ये मिसळवून घ्यावे.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स