24 October 07:00

द्राक्ष सल्ला: फळछाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईडचा वापर


द्राक्ष सल्ला: फळछाटणीनंतर हायड्रोजन सायनामाईडचा वापर

बागेत फळछाटणी ही एकतर काडीच्या तपासणीच्या अनुक्रमाप्रमाणे करावी किंवा आपले बागेतील असलेले अनुभव वापरून छाटणी करावी. शक्यतोवर सबकेन असल्यास गाठीच्या शेजारी एक डोळा राखून तर सरळ काडीवर पेऱ्यातील अंतर कमी आहे अशा ठिकाणी छाटणी घ्यावी.
हायड्रोजन सायनामाईडचा वापर- बागेत फळछाटणीनंतर लगेच हायड्रोजन सायनामाईडचे पेस्टिंग करावे. वातावरणातील तापमान व काडीची जाडी या गोष्टींचा विचार करून मात्रा ठरवावी. साधारणः 8-10 मिमी जाड काडीस 30-35 अंश सेल्सिअस तापमानात 35-40 मिली हायड्रोजन सायनामाईड पुरेसे होईल.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे