01 January 07:00

द्राक्ष सल्ला: पिंकबेरी टाळण्यासाठी द्राक्षघड पेपरने झाका


द्राक्ष सल्ला: पिंकबेरी टाळण्यासाठी द्राक्षघड पेपरने झाका

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८

द्राक्षघड पेपरने झाकणे जेव्हा बागेत किमान तापमान १० अंशच्यापेक्षा खाली येते व कमाल तापमान सुद्धा ३० अंशच्या पुढे जाते अशावेळी किमान व कमाल तापमानात जास्त तफावत वाढते. यामुळे हिरव्या द्राक्षाजातींच्या द्राक्षमन्यात हिरवा असलेला हरीतद्रव्य हा गुलाबी रंगात बदलतो यालाच पिंकबेरी असे म्हटले जाते. पिंकबेरी असलेली द्राक्षे गोड लागतात परंतु, अशी द्राक्षे खाल्ल्याने घशामध्ये खाज आल्यासारखे होते. तेव्हा ही परिस्थिती टाळण्याकरिता द्राक्षघड पेपरने झाकले जातात. पेपर झाकण्याची वेळ ही मन्यात पाणी उतरण्याच्या ८ दिवस आधी असते. यामुळे मन्यात गुलाबी रंग तयार होत नाही.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82