26 November 07:00

द्राक्ष सल्ला: पाऊस व आर्द्रता असल्यास बुरशीनाशकाची धुरळणी करावी


द्राक्ष सल्ला: पाऊस व आर्द्रता असल्यास बुरशीनाशकाची धुरळणी करावी

स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ नाशिक सारख्या भागात जिथे पाऊस व आर्द्रता जास्त असते अशा ठिकाणी छाटणी झाल्यावर सकाळी पानावर, घडावर दव पडून पाणी साचत असेल तर अशा परिस्थितीत केवडा (डाऊनी मिल्ड्यू) होण्याची शक्यता असते यावेळी शेतकरी बुरशीनाशकाची धुरळणी करावी, परंतु या धुरळणीमुळे पानांवर थर जमा होतो त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊन अन्नसाठा निर्माण होत नाही, हे टाळण्यासाठी अनावश्यक व अशक्त अशा फुटी, बगलफुटी काढाव्यात. बागेत पाणी साचल्यास नुसता ब्लोअर ट्रॅक्टर बागेतून फिरवावा त्यामुळे बागेतील पाणी उडून जाईल व रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही.
डॉं. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे