30 December 07:00

द्राक्ष सल्ला: तापमान नियंत्रणासाठी बागेत करा मल्चिंग


द्राक्ष सल्ला: तापमान नियंत्रणासाठी बागेत करा मल्चिंग

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८

मल्चिंगचा वापर करणे द्राक्षबागेत यावेळी किमान तापमानात बरीच घट झालेली दिसून येते. अशावेळी मन्याच्या विकासात अडचणी येतात. बागेत मन्याच्या विकासात आर्द्रता व तापमान या दोन्ही गोष्टींची गरज असते. यावेळी तापमान कमी असल्यामुळे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीमध्ये अडथळे येतात. त्यामुळेच बागेतील तापमान वाढवणे गरजेचे असते. याकरिता बागेत बोदावर मल्चिंगचा वापर गरजेचा असतो. यामुळे मुळातील वातावरणातील तापमानात वाढ होते व त्यामुळेच मुळी चांगले कार्य करते व अन्नद्रव्य व पाण्याचा पुरेपूर फायदा घेऊन वेलीवरील द्राक्षघडांची वाढ चांगली होते.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२७०८०७०
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82