29 September 07:00

द्राक्ष सल्ला: डाऊनी मिल्ड्यू प्रादुर्भाव व नियंत्रण उपाय


द्राक्ष सल्ला: डाऊनी मिल्ड्यू प्रादुर्भाव व नियंत्रण उपाय

द्राक्ष बागेत ओलांड्यावरील साल जुनी झालेली असते व त्यानंतर त्यामध्ये पाणी धरून राहते. पाऊस संपल्यानंतर जेव्हा वातावरण कोरडे व्हायला लागेल अशा परिस्थितीत ओलांड्याजवळ आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते व त्याचाच परिणाम म्हणजे डाऊनी मिल्ड्युचा प्रादुर्भाव वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता बागेत महत्त्वाचे म्हणजे काडीच्या तळातील 3-4 पाने काढून टाकावीत. यामुळे आर्द्रता कमी होईल व रोगनियंत्रण सोपे होईल. असे केल्याने फवारणी सुद्धा कॅनॉपीच्या शेवटच्या कोपऱ्यात पोहचेल व रोगनियंत्रण होईल.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स