27 February 07:00

द्राक्ष सल्ला: काडीवर कोणत्या ठिकाणी रिकट घ्यावा?


द्राक्ष सल्ला: काडीवर कोणत्या ठिकाणी रिकट घ्यावा?

काडीवर कोणत्या ठिकाणी रिकट घ्यावा?
बागेमध्ये कलम केल्यानंतर नवीन फूट निघून वाढ जोमात झाली. अशा ठिकाणी ओलांडासुद्धा तयार झाला असल्यास अशावेळी खरड छाटणी करता येईल. ही परिस्थिती फार कमी ठिकाणी पाहावयास मिळते. काही बागेत खोड तयार होऊन तारेच्या वर फूट परिपक्व झाली असल्यास, तारेच्या ३-४ इंच खाली काप घ्यावा. काही परिस्थितीमध्ये कलम केल्यानंतर निघालेली फूट पावसात रोगांना बळी पडलेली असल्यास फुटीची वाढ फक्त एक ते दीड फूट उंचीवर थांबलेली दिसेल. तेव्हा ज्या ठिकाणी काडी परिपक्व झालेली आहे अशा ठिकाणी किंवा सरसकट कलम जोडाच्या वर ४-५ डोळे राखून रिकट घ्यावा. ज्या बागेमध्ये १०-१२ मि.मी. जाडी आहे अशा ठिकाणी काडीवर रिकट घ्यावा.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82टॅग्स