12 March 07:00

द्राक्ष सल्ला: अशी करा रिकटची पूर्वतयारी


द्राक्ष सल्ला: अशी करा रिकटची पूर्वतयारी

रिकटची पूर्वतयारी
द्राक्षबागेत रिकट घेण्याच्या १२-१५ दिवस आधी २ वेलीमध्ये ३-४ इंच खोल आणि २ फूट रुंद अशी चारी घ्यावी. चारीमध्ये तळात जवळपास दोन घमेली शेणखत, २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट प्रतिवेल टाकावे. एकरी १० ते १२ किलो फेरस सल्फेट, ५० किलो डिएपी टाकून त्यावर मातीचा हलका थर टाकावा. यामुळे बोद तयार होईल. बोदामध्ये हवा खेळती राहून नवीन पांढरी मुळी तयार होईल. ही मुळी कार्यक्षम असते. बागेतील जमिनीत चुनखडी आढळून येत असल्यास बागेत ४०-५० किलो गंधक (सल्फर) प्रति एकर चारी खोदल्यानंतर मातीमध्ये मिसळून घ्यावे. त्यामुळे स्फुरद, पोटॅशसारखी अन्नद्रव्ये जमिनीतून उचलण्यासाठी वेलींना अडचण येणार नाही.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82