04 December 07:00

द्राक्ष सल्ला : द्राक्ष बागेत सोर्स: सिंक स्थापित करणे


द्राक्ष सल्ला : द्राक्ष बागेत सोर्स: सिंक स्थापित करणे

स्त्रोत: कृषिकिंग डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८ द्राक्षबागेत या महिन्यात घडाचा विकास होण्याची अवस्था सुरू असेल या अवस्थेमध्ये मण्याची वाढ महत्त्वाची आहे. कारण याच महिन्यात बागेतील किमान तापमानात घसरण होते. असा परिस्थितीमध्ये घडाच्या विकासात महत्त्वाच्या काही गोष्टी जपणे महत्त्वाचे असेल.

सोर्स: सिंक स्थापित करणे घडाच्या विकासात द्राक्षवेलीच्या ज्या भागातून अन्नद्रव्याचा पुरवठा होतो अशा भागास सोर्स म्हटले जाते. तर विकसीत घडास सिंक म्हटले जाते. घडाच्या विकासात फळकाढणीनंतर सोर्स सिंकचे महत्त्व अधिक आहे. सिंक मजबूत होण्याकरिता सोर्सकडून अन्नद्रव्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने पाने तजेलदार असावीत. यासोबत वेलीची मुळी कार्य करत असावी. बागेतील द्राक्षवेलीची कॅनॉपी मोकळी असल्यास सुर्यप्रकाशाच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण चांगले होईल व घडाचा विकास होण्यास मदत होईल.
डॉं. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स