17 March 12:07

द्राक्ष सल्ला


द्राक्ष सल्ला

रिकट झालेल्या द्राक्ष बागेत डोळे फुटून निघाले असतील अशावेळी सर्व डोळे ठेवणे गरजेचे नाही, यासाठी फक्त वरचे दोन फुट ठेवून बाकीच्या फुटींना २ ते ३ पानांवर थांबवावे. ठेवलेल्या दोन्ही फुटी जर एकसारख्या वाढत असतील तर दोन्ही फुटी ठेवण्यास हरकत नाही यामुळे दोन खोड पद्धती तयार होईल. परंतु दोन्ही फुटी असमान वाढत असतील तर वरच्या फुटीला २ ते ३ पानांवर शेंडा काढून खालच्या फुटीस वाढू द्यावे. कधी चुकून खालच्या फुटीस इजा झाली किंवा तुटून गेली तरी वरची फुट घेऊन पुढे जाता येईल.
डॉ.आर. जी. सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स