12 October 08:30

द्राक्ष बागेसाठी संशोधकांचे शून्य अवशेष शेती तंत्रज्ञान


द्राक्ष बागेसाठी संशोधकांचे शून्य अवशेष शेती तंत्रज्ञान

कृषिकिंग, पुणे: स्पॅनिश संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने द्राक्ष बागेमधील कीटकनाशकांचा वापर आणि पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम निम्याहून कमी केला आहे. तीन वर्षाच्या या प्रकल्पामध्ये द्राक्ष वेलीवरील दोन बुरशीवर काम केले. केवडा (डाऊनी) या रोगावरील किटकनाशकांचा वापर ५० % हून कमी करण्यात यश मिळवले आहे. त्याचवेळी भुरी रोगावरील किटकनाशकांच्या होणाऱ्या वापरात २५ % हून घट झाली आहे. हे संशोधन दोन विविध भौगोलिक भागात केले होते. संशोधनामध्ये शून्य अवशेष शेती तंत्रज्ञान आणि सर्वसामान्य कीटकनाशकांचा वापर केला होता.

युरोपियन शास्त्रज्ञांच्या चमूने मानवी आरोग्य आणि निसर्गावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी विषमुक्ततेची चाचणी करून या प्रकल्पाची शिफारस केली आहे. वरील प्रयोगाचा भारतीय द्राक्ष शेतीमध्येही यशस्वीपणे अवलंब करता येईल का हे अगामी काळामध्ये दिसून येईलच.