08 June 09:04

द्राक्ष बागेतील बगलफुटी वेळीच काढाव्यात


द्राक्ष बागेतील बगलफुटी वेळीच काढाव्यात

वातावरणातील वाढत्या आर्द्रतेमुळे द्राक्ष बागेतील फुटीवरील बगलफूटीची वाढ जास्त प्रमाणात होतांना दिसून येईल.अशा परिस्थितीत कॅनॉपीची गर्दी वाढले व जुनी होत असलेल्या कॅनॉपीमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. याकरिता बागेत बगलफुटी वेळीच काढाव्यात व त्याचबरोबर तळातील 2-3 पाने काढून टाकावीत. यामुळे फुटींची गर्दी टाळता येईल व रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. फवारणी करत असताना सुद्धा फवारणीचे कव्हरेज यशस्वीरित्या करता येऊन रोग सुद्धा वेळीच नियंत्रणात येईल.मोकळी कॅनॉपी असल्यास काडीची परिपक्वता सुद्धा वेळीच करून घेता येईल. यामुळे सूर्यप्रकाशाचा पुरेपूर फायदा घेऊन बागेत काडीमध्ये अन्नद्रव्य गोळा करण्यास मदत होईल.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे