09 March 09:30

द्राक्ष पीक सल्ला


द्राक्ष पीक सल्ला

ज्यावेळी वातावरणातील किमान तापमान १५ डिग्रीपेक्षा जास्त वाढायला लागते. त्यावेळी वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली जलद गतीने होतात. अशावेळी द्राक्ष लागवड केल्यास बाग चांगली फुटून वाढ होईल. त्यामुळे खुंट लागवडीचे व्यवस्थापन योग्यप्रकारे करावे. खुंट लागवड करून एक महिना झाला असल्यास व जिथे पानांची संख्या कमी असून मुळे नुकतीच स्थिरावली आहे अशा परिस्थितीत वेलींची अन्नद्रव्यांची मागणी कमी असते म्हणून युरिया अर्धा किलो प्रति एकर दर तीन दिवसांनी १५ दिवसापर्यंत देत राहावे. जमिनीत वाफसा स्थिती राहील याप्रमाणात वेलींना पाणी द्यावे. पाण्याचा तुटवडा असलेल्या बागेत मल्चिंग करावे.
डॉ. आर. जी. सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणेटॅग्स