26 October 12:50

द्राक्ष उत्पादनात ४० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता- माणिकराव पाटील


द्राक्ष उत्पादनात ४० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता- माणिकराव पाटील

कृषिकिंग, नाशिक: यावर्षी द्राक्ष उत्पादनात ४० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता द्राक्ष व्यापारी सूत्रांकडून व्यक्त केली जात असतानाच आता “सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन ४० टक्क्यांनी कमी होईल.” असे मत महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक असोसिएशनचे सचिव माणिकराव पाटील यांनीही व्यक्त केले आहे. तसेच एप्रिलमध्ये द्राक्ष हंगामाच्या अखेरीस देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांच्या तुटवडा निर्माण होऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले आहे.

"मागील वर्षी आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये द्राक्षाचे दर कोसळले होते. मात्र द्राक्ष निर्यातीत अडथळा जाणवला नाही. मागील वर्षी देशातून २ लाख टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली होती. यावर्षी निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ होणे अपेक्षित आहे," असेही पाटील यांनी सांगितले आहे.टॅग्स