22 November 10:27

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना रेसिड्यू रिपोर्ट आता ऑनलाईन मिळणार


द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना रेसिड्यू रिपोर्ट आता ऑनलाईन मिळणार

कृषिकिंग, पुणे: द्राक्ष बागेतून निर्यातक्षम द्राक्षांचा नमुना तपासणीसाठी नेल्यानंतर त्यात कोणत्या रसायनांचे किती अवशेष आहेत, याची नेमकी व अचूक माहिती द्राक्ष उत्पादकांना तात्काळ मिळणार आहे.

‘अपेडा’च्या संकेतस्थळावर त्याची स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली असून, त्यात ‘लॉगिन आयडी’ म्हणून शेतकऱ्याने बागेचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर त्याचा रेसिड्यू रिपोर्ट उपलब्ध होणार आहे. ‘अपेडा’ने या हंगामापासून (२०१८-१९) ही प्रणाली सुरू केली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची थेट रेसिड्यू रिपोर्ट मिळण्याची दीर्घ काळापासूनची प्रतीक्षा संपणार आहे.

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना रेसिड्यू रिपोर्ट मिळत नाही. त्यामुळे त्यांची व्यवहारात अडवणूक होते, अशी तक्रार शेतकऱ्यांची होती. त्यामुळे शेतकऱ्यांना रिपोर्ट मिळावा, अशी मागणी होत होती. मागील अनेक वर्षांपासून द्राक्ष उत्पादक रेसिड्यू रिपोर्ट थेट मिळण्यासाठी प्रयत्न करीत होते. अखेर शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश आले आहे.टॅग्स