03 June 16:37

देशात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पावसाची नोंद: आयएमडी


देशात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पावसाची नोंद: आयएमडी

कृषिकिंग, पुणे: देशात २५ ते ३१ मे या मॉन्सूनपूर्व काळात, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, उप-हिमालय पश्चिम बंगाल आणि सिक्कीम वगळता, सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

आयएमडीने जाहीर केलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार ९ ते १५ जून दरम्यान मध्य आणि पूर्व भारतात मॉन्सूनचा प्रभाव राहू शकेल. सध्या नैऋत्य मॉन्सूनची स्थिती अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत ७ जूनपर्यंत प्रगती करण्यासाठी अनुकूल आहे. तसेच आयएमडीच्या विस्तारित अंदाजानुसार २ ते ८ जूनच्या कालावधीत दक्षिण द्वीपकल्प (विशेषत: पश्चिम किनारपट्टीवर), उत्तर-पूर्व राज्य आणि पश्चिम बंगालमधील गंगेच्या खोऱ्यात पर्जन्यपट्टा तयार होत आहे.

जम्मू-काश्मीर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व गुजरात आणि उत्तर-दक्षिण कर्नाटक मध्ये सरासरीपेक्षा कमी किंवा शून्य पर्जन्याची नोंद झाली.

दरम्यान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, पूर्व उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, गंगा पश्चिम बंगाल, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, तटीय कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक मध्ये, गेल्या दोन आठवड्यांत सरासरी पाउस झाला. तामिळनाडू हरियाणा, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, उप-हिमालयन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कोकण-गोवा, विदर्भ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, प्रदेश, तेलंगण, केरळ आणि आंध्रमध्ये गेल्या दोन आठवड्यात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त सामान्य पाऊस पडला.