27 August 16:10

देशभरात आतापर्यंत ६ टक्के कमी पाऊस


देशभरात आतापर्यंत ६ टक्के कमी पाऊस

कृषिकिंग, नवी दिल्ली: मॉन्सूनच्या चालू हंगामात देशातील एक-चतुर्थांश प्रदेशात सामान्य प्रमाणापेक्षा कमी पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (आएमडी) दिलेल्या माहितीनुसार, १ जून ते २४ ऑगस्ट याकाळात देशभरात सामान्य पर्जन्यमानाच्या ६ टक्के कमी पाऊस पडला आहे.

आतापर्यंत देशभरात सरासरी ६५५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे, म्हणजेच देशभरात सामान्य पर्जन्यमानाच्या ६ टक्के कमी पाऊस झाला आहे. दक्षिण भारतात ५१८.७ मिमी पाऊस झाला आहे, म्हणजेच दक्षिण भारतात सामान्य पर्जन्यमानाच्या १३ टक्के कमी पाऊस झाला आहे. मध्य भारतात ७२६.४ मिमी पाऊस झाला आहे, म्हणजेच मध्य भारतात सामान्य पर्जन्यमानाच्या ९ टक्के कमी पाऊस झाला आहे. उत्तर-मध्य भारतात ४५७.८ मिमी पाऊस झाला आहे, म्हणजेच उत्तर-मध्य सामान्य पर्जन्यमानाच्या ३ टक्के कमी पाऊस पडला आहे, तर पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात १०५५.६ मिमी पाऊस झाला आहे, म्हणजेच पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात सामान्य पर्जन्यमानाच्या १ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

ऑगस्ट महिन्यात मॉन्सून पूर्णपणे निराशाजनक स्थितीत राहिला आहे. तर, या काळात पडलेल्या कमी पर्जन्याची कसर भरून निघण्याची शक्यताही कमीच आहे. मॉन्सूनचा जूनच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यातील अंदाज वर्तवताना आयएमडीने सरासरी ९८ टक्के पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, यावर्षी मध्यप्रदेश, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशच्या पश्चिमी भागात सर्वसामान्य पेक्षा मॉन्सूनचा जोर कमीच राहिला आहे. तर दुसरीकडे आसाम, बिहार आणि उत्तरप्रदेशचा पूर्व भाग पूरस्थितीने हैराण झाला आहे.टॅग्स