30 October 09:44

दूध उत्पादकांना आणखी तीन महिने अनुदान- जानकर


दूध उत्पादकांना आणखी तीन महिने अनुदान- जानकर

कृषिकिंग, जळगाव: "दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे ५ रुपये अनुदान देण्याची मुदत आॅक्टोबरअखेर संपत होती. मात्र दुष्काळी परिस्थिती असल्याने आणखी तीन महिने अनुदान देण्यात येईल," अशी घोषणा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी जळगावात आयोजित दुष्काळ आढावा बैठकीनंतर केली आहे.

दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी ते जळगाव दौऱ्यावर आले होते. शेतातील पिकांची पाहणी त्यांनी केली. अवघ्या काही मिनिटात त्यांनी आपला पाहणी दौरा आटोपला. शासनाकडून सहकारी संघ व खाजगी संघांना लिक्वीड मिल्क सेल वगळून ज्या अतिरिक्त गाईच्या दुधाचे दूध भुकटीत रूपांतर केले जाते, अशा दूधाला ५ रूपये प्रतिलिटर अनुदान दिले जाते. मात्र संघाने उत्पादकाला त्यांनी खरेदी केलेल्या संपूर्ण दुधावर २५ रु प्रतिलिटर भाव देणे बंधनकारक आहे. योजना आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत कार्यरत होती.