09 March 11:35

दूध अनुदान योजनेला ३० एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ


दूध अनुदान योजनेला ३० एप्रिल २०१९ पर्यंत मुदतवाढ

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील दूध भुकटी व द्रवरूप दुधाची निर्यात करण्यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पांना अनुदान देण्याची योजना पूर्वलक्षी प्रभावाने पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ३० एप्रिल २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, या कालावधीसाठी प्रतिलिटर तीन रुपये याप्रमाणे अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलीये.

राज्यातील उत्पादित होणारे पिशवीबंद दूध वगळून उर्वरित ३.२./८.३ (गाय दूध) आणि त्यापेक्षा अधिक गुणप्रतीच्या दुधासाठी अनुदान देण्यात येत आहे. ही योजना प्रथमतः ३१ ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत आणि त्यानंतर ३१ जानेवारी २०१९ या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यास आता पुन्हा ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.टॅग्स