14 December 10:30

दुष्काळ निवारणासाठी तातडीची मदत करा; फडणवीसांची मोदी भेट


दुष्काळ निवारणासाठी तातडीची मदत करा; फडणवीसांची मोदी भेट

कृषिकिंग, नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

प्रधानमंत्र्यांनीही राज्याच्या या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले आहे. या भेटीसंदर्भांतील माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून दिली आहे.

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने केंद्राकडे ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीची यापूर्वीच मागणी केली असून, ती मदत लवकर मिळावी, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे.