31 January 11:49

दुग्धव्यावसायिकांसाठी चारा कापणी यंत्र; एका तासात ३ टन चारा कापते


दुग्धव्यावसायिकांसाठी चारा कापणी यंत्र; एका तासात ३ टन चारा कापते

कृषिकिंग, (कोइम्बतुर) तामिळनाडू: शेतातून चाऱ्याची कापणी केल्यानंतर घरी घेऊन जात त्याची मशीनने कुट्टी करणे, ही खूप वेळखाऊ प्रक्रिया ठरत आहे. ज्यासाठी मनुष्यबळाचीही मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. परंतु, मल्टी क्रॉप चॉपर मशीनच्या मदतीने कमी वेळात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची कापणी करून जो जनावरांना खाण्यालायक बनवला जाऊ शकतो. तामिळनाडूमधील कोइम्बतुर जिल्ह्यातील संतोष अॅग्री मशिनरी कंपनीने चारा कापणारे एक असे ‘मल्टी क्रॉप चॉपर मशीन’ अर्थात चारा कुट्टी यंत्र बनवले आहे. जे सर्व प्रकारच्या चाऱ्याला खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात कापते.

"‘मल्टी क्रॉप चॉपर मशीन’च्या मदतीने एका तासात ३ टन हिरवा चारा आणि १ टन सुका अर्थात कोरडा चारा जनावरांना खाण्यालायक बनवला जातो. या मशिनच्या मदतीने सर्व प्रकारच्या चाऱ्याला चांगल्या पद्धतीने कापले जाऊ शकते. मग त्यात शेतात जनावरांसाठी उभा असलेला हिरवा चारा असला तरी तो सहज आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कापला जातो. या मशीनला ८० एचपी पेक्षा अधिक क्षमता असलेल्या सर्व प्रकारच्या ट्रॅक्टरसोबतही जोडले जाऊ शकते. त्यामुळे ही मशीन दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरत आहे. कारण दुग्धव्यवसायासाठी खूप मोठ्या प्रमाणात चाऱ्याची आवश्यकता असते. जी या मशीनच्या माध्यमातून मनुष्यबळाचा वापर न करता पूर्ण केली जाऊ शकते." अशी माहिती कंपनीचे टेक्निशियन अवतार सिंह यांनी दिली आहे.

या मशीनला तामिळनाडू शिवाय महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, आंध्रप्रदेश, आणि पंजाब या राज्यांतील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असून, मशीनची किंमत १२ लाख रुपये इतकी आहे. असेही अवतार सिंह यांनी सांगितले आहे.