08 December 18:08

दुःखद बातमी: भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची कांदा चाळीत आत्महत्या


दुःखद बातमी: भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची कांदा चाळीत आत्महत्या

कृषिकिंग, सटाणा(नाशिक): कांद्याला भाव मिळत नसल्याने ४४ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन कांदा चाळीतच आत्महत्या केली आहे. नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील भडाणे गावात ही घटना घडली आहे. तात्याभाऊ खैरनार असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

दोन दिवसापूर्वी ही घटना घडली. मात्र आत्महत्या का केली याचं कारण आज समोर आलंय. तात्याभाऊ खैरनार यांच्यावर बँकांच कर्ज होतं. अशातच कांद्याचे भाव सध्या प्रचंड घसरले आहेत. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने थकीत कर्ज फेडावं तरी कसं, हा प्रश्न खैरनार यांच्यासमोर निर्माण झाला होता.

एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे कांद्याचे घसरलेले भाव यामुळे तात्याभाऊ खैरनार हे संकटात सापडले. यामुळे खैरनार यांनी कांदा चाळीतच गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.