23 November 12:53

दिल्लीत शेतकऱ्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत मोर्चा- राजू शेट्टी


दिल्लीत शेतकऱ्यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत मोर्चा- राजू शेट्टी

कृषिकिंग, कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीतल्या ३० नोव्हेंबरच्या मोर्चासाठी स्वत: विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी दिली आहे.

कोल्हापूरमध्ये शेट्टींनी पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दिल्लीतल्या संसद घेराव आंदोलनाबाबत चर्चा झाली. देशातल्या २२ पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

आपली बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट हमी भाव मिळत असेल तर आपण आघाडीत जाऊ असेही शेट्टी यांनी यावेळी नमूद केले आहे.