29 November 08:30

दिल्लीत कांदा कडाडला; ८० रुपये प्रति किलो


दिल्लीत कांदा कडाडला; ८० रुपये प्रति किलो

कृषिकिंग, नवी दिल्ली: घसरलेल्या पुरवठ्यामुळे राजधानी दिल्लीतील किरकोळ बाजारातील कांद्याचे दर ८० रूपये प्रति किलोपर्यंत पोहचले आहे. आशियातील सर्वात मोठी भाजी बाजारपेठ असलेल्या राजधानी दिल्लीतील आजादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील ठोक बाजारपेठेत कांद्याचा दर हा सध्या ५० ते ६० रुपये प्रति किलो पेक्षा अधिक आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेशसारख्या प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमधून कमी आवक होत असल्यामुळे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांत किमती सर्वोच्च पातळीवर पोहचल्या आहेत.

त्याचप्रमाणे इतर शहरांमधील किरकोळ बाजारातील कांद्याचे दरही वाढले आहेत. अन्य मेट्रो शहरांमध्ये कांद्याची गुणवत्ता आणि स्थानिक पातळीवर ५० ते ७० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री केली जात आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार, “आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या दररोज १२ हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत दररोज २२,९३३ क्विंटल इतकी होती. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत सध्या कांद्याच्या आवकमध्ये ४७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर लासलगाव बाजारपेठेत सध्या कांदा ३३ रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत ७.५० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता.”टॅग्स