28 November 14:30

थेट कांद्याची माळ घालून महिला आमदाराचा विधानसभेत प्रवेश


थेट कांद्याची माळ घालून महिला आमदाराचा विधानसभेत प्रवेश

कृषिकिंग, मुंबई: नाशिक जिल्ह्यातील बागलाण (सटाणा) विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दिपीका चव्हाण यांनी आज विधानसभेत कांद्याची माळ घालून प्रवेश केला. कांद्याच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी सभागृहात कांद्याची माळ घालून सरकारला धारेवर धरले.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आक्षेप घेतल्याने दिपीका चव्हाण यांना कांद्याची माळ गळ्यातून काढावी लागली. कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले असून, शेतकऱ्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांना उत्पादन खर्च मिळणेही अवघड झाले आहे. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीकोनातून आमदार दिपीका चव्हाण यांनी ही युक्ती केली.