10 January 12:50

थंडीमुळे द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता


थंडीमुळे द्राक्ष निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता

कृषिकिंग, नाशिक: उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा ५ अंश सेल्सिअस पेक्षाही कमी राहिल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागांना फटका बसला आहे. त्यामुळे १५०० ते २००० कोटीहून अधिक रुपयांचे द्राक्षांचे नुकसान होणार आहे. बुधवारी निफाड तालुक्यातील कसबे सुकेणेत २.५, शिवडीत ३.३, सारोळे खुर्दत ३ अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

दहा डिसेंबरपासून निफाड तालुका गारठला आहे. गहू, हरभऱ्याला फायदा होत असला तरी द्राक्षांवर याचा परिणाम होत आहे. वाढत्या थंडीमुळे तसेच सध्‍या इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या बाष्पामुळे द्राक्षबागांवर हिमकण गोठले आहेत. तयार झालेले द्राक्षमणी भाजल्यागत झाले आहे. या थंडीमुळे दोन लाख एकरावरील जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे क्षेत्र धोक्यात आले आहे. एकूण उत्पन्नात १५ टक्के म्हणजेच पंधराशे ते दोन हजार कोटींचे नुकसान होण्याचा प्राथमिक अंदाज द्राक्ष उत्पादक संघाचे सदस्य कैलास भोसले यांनी व्यक्त केला आहे.टॅग्स